Mohata Devi : आई राजं उदो-उदोच्या जयघोषात श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळी उत्साहात

Mohata Devi : आई राजं उदो-उदोच्या जयघोषात श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळी उत्साहात

0
Mohata Devi : आई राजं उदो-उदोच्या जयघोषात श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळी उत्साहात
Mohata Devi : आई राजं उदो-उदोच्या जयघोषात श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळी उत्साहात

Mohata Devi : पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटादेवीगड (Mohata Devi) येथे हुताशनी पौर्णिमेनिमित्त होळीचा (Holi) सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शक्तीपीठ (Shaktipeeth) मानल्या जाणाऱ्या या पावन स्थळी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यावेळी देवीच्या मंदिरात विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा आणि परिसर फुलांच्या देखण्या आरासेमुळे उजळून निघाला होता. सकाळी अभिषेक पूजा व महाआरतीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

नक्की पहा : कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून

होळी सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक

दुपारी आरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. होळी हा सण भारतीय संस्कृतीतील वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. फाल्गुन पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला धार्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व आहे. मनातील वाईट विचार, अशुद्ध प्रवृत्ती आणि अमंगल गोष्टींचे होळीच्या अग्नीत दहन करून अंत:करण शुद्ध करण्याचा संदेश या सणातून दिला जातो.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

शास्त्रोक्त पद्धतीने होलिका दहन (Mohata Devi)

देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब लाहोटी यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने होलिका दहन करण्यात आले. आई राजं उदो-उदो च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वे. भूषण साकरे, वे. भास्कर देशपांडे व विकास क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे पौराहित्य केले. अहिल्यानगर येथील भाविक राजू बलभीम सानप यांच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले रात्री कीर्तन व भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.