Beating | पोलीस कर्मचाऱ्याकडून बसच्या वाहक व चालकाला मारहाण

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा

0

Beating : राहाता: येथील बसस्थानकात एसटी बस घेऊन येणाऱ्या बस चालक व कंडक्टर यांना लाथा व बुक्क्यांनी मारहाण (Beating) करून शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्या येवला पोलीस ठाणे  येथे नेमणूकीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल व  त्यांच्या बरोबर असलेल्या तीन व्यक्ती विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनतेचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशी वर्तणूक केल्यामुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम होत असण्याची चर्चा पोलिस व नागरिकांमध्ये दिसून आली. 

अवश्य वाचा-   संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री विखे पाटील

शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा (Beating)

  याबाबत  राहाता पोलीस ठाण्यात बस कंडक्टर बालाजी पंडितराव बोरगावकर व चालक विकास बालाजी मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रविवारी (ता.१) सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान राहाता बस स्थानकात एटी बस क्रमांक एम एच २४ ए यु ७९७० घेऊन येणारे चालक विकास मुंढे व कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना सध्या येवला पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व सार्थक संजय बनसोडे व त्यांच्याबरोबर असलेल्या दोन व्यक्तींनी एसटी बस चालक व कंडक्टर यांना शिवीगाळ दमबाजी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून एसटी बस चालक यांच्या सरकारी गणवेशाचा खिसा फाडला. सदर मारहाणीत एसटी बस चालक यांना मार लागलेला आहे. फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व त्यांच्याबरोबर असलेल्या तीन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.