Beating: नगर तालुका: मोबाइल घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने आई-वडिलांना जबर मारहाण (Beating) केल्याची घटना रविवारी (ता.१) रात्री बारा वाजेच्या सुमारास चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनश्याम संतोष जाधव (रा. चिचोंडी पाटील, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे.
अवश्य वाचा- कोपरगावात युवकाचा दगडाने ठेचून खून
आरोपीच्या वडिलांनी दिली फिर्याद (Beating)
याबाबत आरोपीचे वडील संतोष बन्सी जाधव यांनी फिर्याद दिली. त्यांचा मुलगा घनश्याम हा रविवारी रात्री दारू पिऊन आला. त्याने मोबाइल घेण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले. त्यावर माझ्याकडे पैसे नाहीत, असे वडील त्याला म्हणाले. त्याचा त्याला राग आला. त्याने आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने घरातील झारीने आईला मारहाण केली, तसेच वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. मोबाइल घेण्यासाठी पैसे दिले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.



