Burglary : नगर : अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) हद्दीत असलेल्या तांबटकर मळा परिसरात घरफोडी (Burglary) करून रोख रक्कम व सोने चांदी चे दागिने असा एकूण दोन लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा: केडगाव परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
२ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक मार्च ते ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन (Burglary)
चोरट्यांनी ८० हजार रुपये रोख रक्कम, विविध वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, गंठण, कानातील दागिने, तसेच चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे. घरमालक बाहेरगावी गेले असताना ही घटना झाली असल्याची समजते. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, नागरिकांनी घर बंद ठेवताना योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



