Holi : शेकडो वर्षापासुन चालत आलेली डसन डुक्करची प्रथा आजही कायम

Holi : शेकडो वर्षापासुन चालत आलेली डसन डुक्करची प्रथा आजही कायम

0
Holi : शेकडो वर्षापासुन चालत आलेली डसन डुक्करची प्रथा आजही कायम
Holi : शेकडो वर्षापासुन चालत आलेली डसन डुक्करची प्रथा आजही कायम

Holi : राहाता : डुकराची वेशभुषा करुन मारुती मंदिरासमोरील (Maruti Temple) होळीचे (Holi) दर्शन घेवुन, होळीची राख कपाळाला लावुन हातात झाडू व स्मशनातील सुप घेऊन समोरच्या व्यक्तिला मारणे, व मार खाणाऱ्याला हे वर्ष चांगले जाते, पिडा जाते, असा समज आहे. झाडू व सुप मारण्याच्या या प्रक्रियेत कमालीची धमाल उडून जाते. ही प्रथा गेली ४ ते ५ पिढ्यांपासुन (Generations) सुरु असल्याची माहिती आहे, परंतु नक्की कुणालाही सांगता येत नाही अशी प्रथा केलवडकरांनी जपली आहे. 

नक्की वाचा : निधी वाटप करताना कधीही भेदभाव केला नाही : अमोल खताळ

परगावी सर्व्हिससाठी असलेलेही उत्सवासाठी गावी परततात

यातील डसन डुकराचा वेश परिधान करुन वाजत गाजत लोकांना मार पडतो, तो मार लोक प्रेमाने स्विकारतात. डसन डुकराचे सोंग गावातीलच लोक वठवत असतात. यातुन दहा, वीस रुपये गोळा करण्याची प्रथा आहे. धुलीवंदनाच्या दिवशी डसन डुक्कर निघत असल्याने केलवडच्या बाहेर गावी दिलेल्या मुली आपल्या माहेरला खास या उत्सवासाठी येतात. परगावी सर्व्हिससाठी असलेलेही गावी परततात.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

हा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतात (Holi)

हा सोहळा धुलीवंदानाच्या दिवशी सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत असतो. त्यानंतर ग्रामस्थ टिपरीचा खेळ खेळतात. असा हा आगळा वेगळा सोहळा पाहण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करतात. आधुनिकतेची कास धरत व आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा सुद्धा केलवड गावातील नागरिक होळीच्या निमित्ताने पार पाडताना दिसून आले.