Jyoti Gade : नगर : उद्यान (Garden) विभाग हा शहराच्या सौंदर्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे उद्यानातील स्वच्छता, आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा यामध्ये सुधारणा दिसली पाहिजे.महिन्याभरात उद्यान विभागाच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाला पाहिजे. प्रत्येक उद्यान स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक असले पाहिजे. हेच नगरकरांप्रती आपले उत्तरदायित्व आहे, असे निर्देश महापौर ज्योती गाडे (Jyoti Gade) यांनी दिले. अहिल्यानगर महापालिकेच्या (Ahilyanagar Municipal Corporation) उद्यान विभागाची बैठक महापौर ज्योती गाडे व उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील सर्व उद्यानांची सद्यस्थिती, स्वच्छतेची कामे, महापुरुषांच्या पुतळ्यांची देखभाल, तसेच नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
नक्की वाचा : शेकडो वर्षापासुन चालत आलेली डसन डुक्करची प्रथा आजही कायम
महापौर गाडे म्हणाल्या की
महापौर गाडे म्हणाल्या, महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता, फुलझाडांचे संवर्धन आणि मनोरंजनासाठी आवश्यक साधनसामग्री पुरवणे आवश्यक आहे.उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असली तरी नियोजनशीर पद्धतीने काम केल्यास परिणाम निश्चितच दिसून येतील. शहरात ‘उद्यान स्वच्छता अभियान’ राबविण्याचे आदेश देत असून, या अभियानात नागरिकांनी देखील सहभाग घ्यावा. नगरकर आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच शहर सुंदर बनू शकते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
उद्यान नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल (Jyoti Gade)
उपमहापौर अॅड. धनंजय जाधव म्हणाले की, उद्यान विभागाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली आहे.
विभागातील अडचणी समजून घेतल्या असून त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील. उद्यान विभागाला आवश्यक साहित्य, साधनसामग्री पुरवली जाईल. मात्र, विभागाने देखील आपल्या कामगिरीत गुणवत्ता दाखवावी. महापालिकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडल्यास शहरातील प्रत्येक उद्यान नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.
उपाययोजनांवर भर
बैठकीदरम्यान उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजन आणि आस्थापना विभाग प्रमुख गणेश लईचट्टी यांनी विभागातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. शहरातील उद्याने अधिक सुंदर व सुरक्षित बनवण्यासाठी नियमित स्वच्छता, फुलझाडांची देखभाल, झाडांवर पाण्याची व्यवस्था, तुटलेली बाके व उपकरणे दुरुस्त करणे यासारख्या उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.



