Suicide : श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील रेल्वे स्टेशन (Railway station) परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने शिवाजीनगर भागात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.३) दुपारी घडली. मयत तरुण शहरात HDFC बँकेत (HDFC Bank) नोकरीला होता, त्याच्या या टोकाच्या पावलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सागर सखाराम निंबाळकर (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे.
नक्की वाचा : सौर प्रकल्प बसवूनही लाखोंची वीजबिले; शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या
परिसरात मोठी खळबळ
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी (ता.३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास सागरने शिवाजीनगर परिसरातील एका खोलीवर जाऊन गळफास घेतला. ऐन तारुण्यात आणि चांगल्या पदावर कार्यरत असलेल्या तरुणाने असे पाऊल उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
कारण अद्याप गुलदस्त्यात (Suicide)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी किरण तुकाराम निंबाळकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सागरच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.



