Suicide : राहाता : तालुक्यातील साकुरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका पतसंस्थेकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून साकुरी (Sakuri) येथील एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. यामुळे साकुरी सह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. योगेश गायकवाड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. योगेच्या निधनामुळे (Death) साकुरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की वाचा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम
घर जप्त करण्याची धमकी
याबाबत संविस्तर माहिती अशी (ता. २५) फेब्रुवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका पतसंस्थेचे वसुली कर्मचारी हे मयताच्या घरी आले असता त्यांनी योगेशच्या घरा बाहेर उभे राहून योगेश याला बोलावले त्यावेळी योगेश हा घरी नव्हता योगेशची आई त्यावेळी घरीच होती. सदर पतसंस्थेचे वसुली अधिकारी मयताच्या आईला बोलले की तुमच्या मुलाने आमच्या संस्थेकडून कर्ज घेतले असून ते कर्ज अद्याप भरले नाही. आम्ही त्याला दररोज फोन करत आहोत तो आमचे फोन उचलत नाही जर आज आम्हाला पैसे मिळाले नाही तर आम्ही तुमचे घर जप्त करू व तुम्हाला घराबाहेर काढून देवू असे सदरील कर्मचारी मयताच्या आईस बोलले.
अवश्य वाचा : कुख्यात सागर मोहळकरवर गोळीबार; जामखेड तालुका हादरला
मोबाईल हिसकावून घेतला (Suicide)
यावेळी मयताच्या आईने सांगितले की माझा मुलगा घरात नाही. त्यावेळी सदर कर्मचाऱ्यांनी योगेशला फोन करण्यास सांगितले. मयताच्या आईने योगेश याला फोन केला असता सदर कर्मचाऱ्यांनी मयताच्या आईच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला व योगेशला फोन वरून धमकी देण्यास सुरवात केली. यावेळी मयत योगेश याने सदर कर्मचाऱ्यांना कर्जाचे पैसे भरण्यास थोडी मुदत वाढवून देण्याची विनंती केली असता कर्मचाऱ्यांनी मयताचे काहीही ऐकून घेतले नाही त्यानंतर मयत योगेश हा दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी आला व तो कुणाशीही संभाषण न करता सरळ त्याच्या खोलीत निघून गेला त्यानंतर काही वेळाने मयताच्या आईने त्याला चहा घेण्यासाठी आवाज दिला असता त्याने कुठलाही प्रतिसाद दिला नाही, त्यांतर योगेशच्या आईने त्याच्या खोलीत जाऊन बघितले असता योगेश याने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
कठोर कारवाई करण्याची मागणी
त्यांतर मयताच्या आईने आरडा ओरडा सुरु केला असता शेजारील लोक धावत आले. त्यांनी मयत योगेश याला खाली उतरवले व जवळच असलेल्या शिर्डी येथील खाजगी रूग्णालयात घेऊन गेले यावेळी डॉक्टरांनी योगेश याला मयत घोषित केले. मयत योगेश याने पतसंस्थेच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. संबधीत पतसंस्थेच्या वसुली अधिकाऱ्यांवर आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबधितांवर कठोर कारवाई करावी असे निवेदन मयताचा भाऊ निलेश गायकवाड याने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे .



