Get Together : शिर्डी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

Get Together : शिर्डी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

0
Get Together : शिर्डी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
Get Together : शिर्डी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

Get Together : राहाता : स्नेहसंमेलन (Get Together) आपल्याला केवळ भूतकाळाची आठवण करून देत नाही, तर पुढील काळातही असेच एकत्र राहण्याची प्रेरणा देते. आपण समाजासाठी, देशासाठी आणि मानवतेसाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा संकल्प याच मंचावरून करूया असे मनोगत डॉ.राजेंद्र पिपाडा (Dr. Rajendra Pipada) यांनी व्यक्त केले. सालाबाद प्रमाणे यंदाही मेडिकल कॉलेजच्या (Medical College) माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शिर्डी येथे मोठ्या उत्साहात झाला. या दोन दिवसीय कार्यक्रमाला सन 1975 ते 1988 या कालावधीतील एकूण 70 डॉक्टर उपस्थित होते.

नक्की वाचा : पतसंस्थेच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून साकुरीत तरुणाची आत्महत्या

70 डॉक्टर उपस्थित

या स्नेह संमेलनाच्या आयोजनामध्ये डॉ. प्रकाश कोळपे त्यांच्या परिश्रमातून व नियोजनातून वार्षिक स्नेह संमेलन झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जे. डी. पाटील उपस्थित होते.या वेळी डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. राजेंद्र पिपाडा, डॉ. सुधीर गोडबोले, डॉ. अजित वहीकर, डॉ. राधा मॅडम, डॉ. मुकुंद भणगे, डॉ. गुंजाळ (कोळपेवाडी), डॉ. राजश्री नवलाखे, डॉ. प्रल्हाद उडान, डॉ. रंगरेज, डॉ. अरुण निकम, डॉ. विजय सेनानी, डॉ. भुरे, डॉ. कैलास पाटील, डॉ. अवताडे, डॉ. रवींद्र पांडे, डॉ. लक्ष्मीकांत गोमटे आदींसह एकूण 70 डॉक्टर उपस्थित होते.

अवश्य वाचा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम

शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव (Get Together)

राजकीय क्षेत्रातुन पुढे जात डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी स्वतच्या कर्तत्त्वावर राज्यभर आपली एक वेगळी ओळख निर्माण करुन राजकीय पटलावर ठसा उमटवला आहे. अशी भावना माजी प्राचार्य़ डॉ. जे.डी पाटील यांनी बोलताना व्यक्त केली. यावेळी डॉ. प्रकाश कोळपे यांनी गेल्या दहा वर्षांत उभारलेल्या शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांनी आयुर्वेदिक कॉलेज, फार्मसी कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारून उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

जुन्या आठवणींना उजाळा

डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आपल्या भाषणातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या आठवणींनी उपस्थितांच्या मनात भावनिक आणि आनंददायी वातावरण निर्माण केले. भूतकाळातील सहवास, मैत्री आणि अनुभव त्यांनी जिवंतपणे उलगडले. त्यांच्या आठवणींमुळे स्नेहसंमेलन अधिक आपुलकीचे आणि संस्मरणीय ठरले. प्रमुख पाहुणे डॉ. जे. डी. पाटील यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला व सर्वांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. हा स्नेह मेळावा मागील वर्षी जालना येथे आयोजित केला होता. पुढील वर्षीचा मेळावा नाशिक येथे घेण्याचे ठरले आहे. शिर्डी येथे झालेल्या या दोन दिवसीय स्नेह संमेलनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून सर्वजण पुढील वर्षाच्या मेळाव्याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.