Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारा संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारा संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारा संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : गावठी कट्टा बाळगणारा संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : नेवासा तालुक्यामध्ये गावठी कट्टा बाळगून दहशत करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Branch) जेरबंद केला आहे त्याच्याकडून गावठी कट्टा (Gavathi Katta) व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत सोनई पोलीस ठाण्यात सतीश विश्वनाथ कसबे (वय- ३०, रा.मोरेचिंचोरे ता.नेवासा जि. अहिल्यानगर), याचे विरुद्ध गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : शिर्डी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

मुद्देमाल हस्तगत

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात असलेल्या अवैध कट्ट्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने नेवासा तालुक्यात गावठी कट्ट्याबाबत शोध घेत असतात मोरेचिंचोरे परिसरात एक युवक कमरेला गावठी कट्टा घेऊन दहशत करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

पाच गावठी कट्टे व नऊ जिवंत काडतुसे जप्त (Local Crime Branch)

याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, ह्रदय घोडके, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से, शाम जाधव, प्रशांत राठोड, मनोज साखरे, योगेश कर्डिले यांच्या पथकाने केली. दरम्यान गेल्या महिन्याभरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तब्बल पाच गावठी कट्टे व नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.