Attack on School Boy : भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलावर कोयत्याने वार !

Attack on School Boy : भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलावर कोयत्याने वार !

0
Attack on School Boy : भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलावर कोयत्याने वार !
Attack on School Boy : भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलावर कोयत्याने वार !

राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील घटना, दोघे संशयित सीसीटीव्हीत कैद !!

Attack on School Boy : राहुरी : मुसळवाडी येथे भरदिवसा घरात घुसून शाळकरी मुलावर कोयत्याने वार (Attack on School Boy) केल्याची धक्कादायक घटना ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अज्ञातांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हल्लेखोर हे जवळच्या सीसीटीव्हीत (CCTV Camera) कैद झाले असून त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.

नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

पायाच्या बोटावर कोयत्याने वार करून केले जखमी

कृष्णा सीताराम भुजाडी(रा.मुसळवाडी, ता.राहुरी) यांनी फिर्याद दिली. ३ मार्च रोजी कृष्णा भुजाडी यांचा मुलगा साई(वय-१४) हा घरात असताना घराच्या पाठीमागून अज्ञात दोघे जण आले. त्यांनी साई याचे तोंड दाबून कवळी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्यातील एकाने कोपऱ्याने मारून लोटून देत घरात जात असताना दुसऱ्याने साई भुजाडी याच्या उजव्या पायाच्या बोटावर कोयत्याने वार करून जखमी केले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Attack on School Boy)

याबाबत दोन अज्ञातांविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी हे करीत आहेत.