Women’s Day : महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये नगर IVF सेंटरचा उपक्रम

Women's Day : महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये नगर IVF सेंटरचा उपक्रम

0
Women's Day : महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये नगर IVF सेंटरचा उपक्रम
Women's Day : महिला दिनानिमित्त अहिल्यानगरमध्ये नगर IVF सेंटरचा उपक्रम

Women’s Day : नगर : आई होण्याचं स्वप्न हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न मानलं जातं. या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अहिल्यानगरमधील नगर IVF सेंटर (Nagar IVF Center) येथे सात अनुभवी (Experienced) आणि समर्पित महिला डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. ही टीम अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. महिला दिनानिमित्त (Women’s Day) या सेंटरकडून विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम ब्लू स्टोन बिल्डिंग, स्वास्थ हॉस्पिटल शेजारी, लालटाकी, अहिल्यानगर येथे होणार आहे.

नक्की वाचा : ‘पासवर्ड वाचन अभियान’ विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी – आनंद भंडारी

मोफत वंध्यत्व तपासणी शिबिर आयोजित

या उपक्रमात आधुनिक व वैद्यकीय तंत्रज्ञानासोबत  IUI, IVF, ICSI, TESA, DFI of Sperm, ART Bank आणि Surgery Center या उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने १ मार्च ते १५ मार्च दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत वंध्यत्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय सोनोग्राफी आणि लॅब तपासणी  IUI आणि IVF सायकल देखील सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

नावनोंदणी करणे आवश्यक (Women’s Day)

नगर IVF सेंटरचे म्हणणे आहे की, ही केवळ सेवा किंवा उपचारपद्धती नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात करण्याचा विश्वास आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी  इच्छुक दाम्पत्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे, असेही सेंटरच्या वतीने सांगण्यात आले आहे.