Crime : पारनेर : फिर्यादीचे वकिलपत्र (Affidavit) घेतल्याच्या रागातुन जवळे, तालुका पारनेर (Parner) येथील रामदास मारूती सालके यांनी पारनेर बारचे सदस्य असलेले वकील सोमनाथ गोपाळे यांना पारनेर न्यायालय (Parner Court) परिसर आणि जवळे येथील कुकडी सहकारी पतसंस्थेच्या आवारात धमकावून गलिच्छ शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे.
नक्की वाचा : यूपीएससीत महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांचे यश; पहिल्या १०० मध्ये राज्यातील पाच जण
गुन्हा दाखल
याबाबत अॅड. सोमनाथ गोपाळे यांनी रामदास सालके यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धमकावणारा आरोपी हा मुंबई पोलिस दलातील निवृत्त पोलिस अधिकारी आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन पारनेर बार असोशिएशने बैठक बोलावली होती. अशा प्रकारांमुळे वकीलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने, यावेळी या घटनेचा संघटनेकडून निषेध करण्यात आला. अॅड. गोपाळे यांना धमकावणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी पारनेर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
पारनेर बार संघटनेचे सदस्य मोठ्या संखेने हजर (Crime)
पारनेर बार संघटनेचे अध्यक्ष मंगेश औटी यांच्याकडून पारनेर पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी यावेळी निवेदन स्विकारून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन बारच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी पारनेर बार संघटनेचे सदस्य मोठ्या संखेने हजर होते.



