
SUBEDAAR : अमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) वरील प्राइम ओरिजिनल चित्रपट ‘सुबेदार’ (SUBEDAAR) भारतीय कथा जागतिक स्तरावर पोहोचवत आहे. या आंतरराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन-ड्रामा चित्रपटाची झलक न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर (Times Square) वरील भव्य स्क्रीनवर पाहायला मिळाली. जगातील सर्वात मोठ्या कमर्शियल चौकांपैकी एक असलेल्या टाइम्स स्क्वेअरवर चित्रपटाचे असे प्रदर्शन होणे भारतीय सिनेमासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. यामुळे भारतीय कथांना जागतिक व्यासपीठावर वेगळी ओळख मिळत आहे.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभवामुळे या चित्रपटाचे कौतुक
मुख्य भूमिकेत असलेल्या Anil Kapoor यांच्या दमदार अभिनयामुळे आणि उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभवामुळे या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. जगभरातील मोठ्या आंतरराष्ट्रीय कॅम्पेन आणि ब्लॉकबस्टर प्रमोशनसाठी प्रसिद्ध असलेले Times Square ग्लोबल लॉन्चसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे व्यासपीठ मानले जाते. अशा ठिकाणी ‘सुबेदार’ झळकणे ही भारतीय कथांसाठी मोठी उपलब्धी ठरत आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
भावनिक अॅक्शन-ड्रामा असलेला चित्रपट (SUBEDAAR)
एक दमदार आणि भावनिक अॅक्शन-ड्रामा असलेला ‘सुबेदार’ हा चित्रपट सूबेदार अर्जुन मौर्य यांच्या आयुष्याभोवती फिरतो. अर्जुन हे निवृत्त सैनिक आहेत. एका दुर्लक्षामुळे त्यांचे शांत आयुष्य पूर्णपणे बदलून जाते आणि त्यांना पुन्हा गोंधळाच्या जगात पाऊल टाकावे लागते. आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि स्वतःचा सन्मान परत मिळवण्यासाठी त्यांना गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि योग्य-अयोग्य यांच्या संघर्षाला सामोरे जावे लागते.
दिग्दर्शक Suresh Triveni यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून Vikram Malhotra, Anil Kapoor आणि स्वतः त्रिवेणी यांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे. चित्रपटात Radhika Madan मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत Saurabh Shukla, Aditya Rawal, Faisal Malik, Mona Singh आणि Khushbu Sundar यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘सुबेदार’चा प्रीमियर 5 मार्च रोजी खास Amazon Prime Video वर झाला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.


