National Pharmacy Education Day | राजळे कॉलेज ऑफ फार्मसीत राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन उत्साहात

हर्बेरियम तयार करण्याची स्पर्धा

0

National Pharmacy Education Day: पाथर्डी: आदिनाथनगर येथील लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये भारतातील फार्मसी शिक्षणाचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन (National Pharmacy Education Day) उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी दादापाटील राजळे  महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. जे. एन. नेहुल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अवश्य वाचा- श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

हर्बेरियम तयार करण्याची स्पर्धा (National Pharmacy Education Day)

यावेळी डॉ. नेहुल यांनी विद्यार्थ्यांना हर्बेरियम शीट तयार करण्याची पद्धत, फार्माकॉग्नोसीमध्ये वनस्पतींचे असलेले महत्त्व, वनस्पतींचे टॅक्सोनॉमिकल वर्गीकरण तसेच सामाजिक आरोग्य व्यवस्थेमध्ये औषधी वनस्पतींचे योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. औषधी वनस्पतींचा अभ्यास हा फार्मसी शिक्षणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून विद्यार्थ्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे त्यांनी सांगितले. या निमित्ताने मेडिसिनल प्लांट्स अराउंड अस या विषयावर हर्बेरियम तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने तसेच मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध औषधी वनस्पतींचे नमुने संकलित करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने सादरीकरण केले.

नक्की वाचा- शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

प्राचार्य डॉ. एस. जी. खणगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन (National Pharmacy Education Day)

या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. एस. जी. खणगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. आर. एम. हांडाळ व प्रा. एस. एस. शहरवाले यांनी केले. याप्रसंगी प्रा. अंबादास कटारनवरे, प्रा. विकास गव्हाणे, प्रा. सौरभ सौदर, प्रा. अपेक्षा फुंदे, प्रा. पूनम घोरपडे, प्रा. सरिता पवार, प्रा. मयूर जोशी, प्रा. हृषीकेश वराडे, प्रा. प्रज्ञा शिंदे, प्रा. ऋषिकेश वांढेकर, प्रा. दीपाली चितळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेच्या विश्वस्त आमदार मोनिका राजळे, राहुलद राजळे तसेच मार्गदर्शक बी. एम. गोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.