Gunfire : नगर : जामखेड येथे एका हॉटेल समोर गोळीबार (Gunfire) करून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय- २४, रा. पाटोदा गरड, ता. जामखेड), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा त्याचे साथीदार शुभम शहाराम लोखंडे, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, अर्शद अमीन सय्यद व अनोळखी 6 ते 7 यांनी मिळुन फिर्यादीस जिवे मारण्याचे उद्देशाने पिस्टलने फायर करुन गंभीर जखमी केले असल्याची पोलीस तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
अक्षय मोरे विरुद्ध दहा गुन्हे दाखल
ताब्यात घेतलेला संशयित अक्षय मोरे हा सरायित गुन्हेगार असूनत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दहा गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासासमोर आले आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
खर्डा परिसरात सापळा आरोपीला घेतले ताब्यात (Gunfire)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथे एका हॉटेल समोर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न अक्षय मोरे व त्याच्या साथीदार यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खर्डा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी ताब्यात घेतले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, समीर अभंग, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, ह्रदय घोडके, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, रिचर्ड गायकवाड, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डिले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक अर्जुन बडे, भगवान धुळे तसेच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पुष्कर कडु, पोलीस अंमलदार प्रविण इंगळे, रविंद्र वाघ, देवीदास पळसे, कुलदीप घोळवे, दत्तात्रय बेल्हेकर, आकाश शेवाळे, प्रताप देवकाते, मनोज लातुरकर यांच्या पथकाने केली.



