Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

0
Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

Shiv Jayanti : संगमनेर : “जय भवानी, जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) की जय!” या घोषणांनी संगमनेर शहर शनिवारी अक्षरशः दणाणून गेले. शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती (Shiv Jayanti) मिरवणुकीने तब्बल सात तास शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ऐतिहासिक देखावे, ढोल-ताशांचा कडकडाट, अघोरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि अफजलखान वधाचा जिवंत देखावा हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.

नक्की वाचा : धक्कादायक! पाथर्डीत ४७ पैकी ३५ रक्त-लघवी तपासणी केंद्रे अनधिकृत

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

नगरपालिकेपासून मिरवणुकीला सुरुवात

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संगमनेर नगरपालिकेपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शिवचरित्रकार सोपानराव तथा एस. झेड. देशमुख, आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्षा पायल ताजणे, तालुकाध्यक्षा कविता पाटील, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अवश्य वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

संगमनेर बसस्थानक येथे या मिरवणुकीची सांगता (Shiv Jayanti)

नगरपालिकेपासून सुरू झालेली ही मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहोचली. येथे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर संगमनेर बसस्थानक येथे या मिरवणुकीची सांगता झाली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मिरवणुकीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी, भगव्या पताका आणि आकर्षक फुलांची सजावट यामुळे शहर भगवेमय झाले होते.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष

जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी

या मिरवणुकीत शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोष पथक, दहा वर्षांच्या चिमुकल्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ, एरियल योगा तसेच ‘आदि योगी महादेव’ यांचा देखावा आदींचा समावेश होता. अफजलखान वधाचा जिवंत देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याशिवाय अघोरींचे नृत्यही उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. मावळ येथील किंग स्टार ब्रास बँड पथक आणि एकलव्य ढोल-ताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. ढोल-ताशांच्या कडकडाटात, जयघोषांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने निघालेल्या या भव्य मिरवणुकीने संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.