Sagar Moholkar Attack : जामखेड येथील सागर मोहोळकर यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Sagar Moholkar Attack : जामखेड येथील सागर मोहोळकर यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Sagar Moholkar Attack : जामखेड येथील सागर मोहोळकर यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Sagar Moholkar Attack : जामखेड येथील सागर मोहोळकर यांच्यावर गोळीबार करणारा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Sagar Moholkar Attack : नगर : जामखेड येथील सागर मोहोळकर यांच्यावर गोळीबार (Sagar Moholkar Attack) करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जामखेड तालुक्यातील सिक्री या गावातून जेरबंद केला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा (Gavathi Katta) जिवंत काडतूसे असा एकूण ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद

९० हजारांचा मुद्यमाल हस्तगत

अभिमन्यु महादेव पोते (वय २४, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पुर्ण नांव माहित नाही, रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे(फरार), रोहित विठ्ठल आखाडे रा. शास्त्रीनगर, कोथरुड पुणे(फरार), चिन्या पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड पुणे(फरार), यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा, जिवंत काडतुसे असे एकूण ९० हजारांचा मुद्यमाल हस्तगत करण्यात आला.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

जुन्या वादातून गावठी कट्ट्यातून फायर (Sagar Moholkar Attack)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार जामखेड येथे सागर मोहोळकर याच्यावर जुने वादातून गावठी कट्ट्यातून फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न पोते याने त्याच्या साथीदार असं केलं असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली केला. त्यानुसार पथकाने जामखेड तालुक्यातील सिक्री येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डीले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.