Rajendra Pipada : गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्याहे प्रकार संतापजनक : राजेंद्र पिपाडा

Rajendra Pipada : गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्याहे प्रकार संतापजनक : राजेंद्र पिपाडा

0
Rajendra Pipada : गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्याहे प्रकार संतापजनक : राजेंद्र पिपाडा
Rajendra Pipada : गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्याहे प्रकार संतापजनक : राजेंद्र पिपाडा

Rajendra Pipada : राहाता : शिर्डी मतदार संघातील (Shirdi Constituency) राहाता येथे गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या करण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. ही अत्यंत शरमेची बाब आहे. हे प्रकार संतापजनक असल्याचे सांगत या प्रकरणातील संबंधित डॉक्टर व केंद्रांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा (Rajendra Pipada) यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर (Prakash Abitkar) यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

नक्की वाचा : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर; लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

दोषींवर कारवाई करण्याची मागणी

यावेळी डॉ. पिपाडा यांनी राहाता तालुक्यात काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकारामुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात आहे. मुलगी जन्माला येण्याआधीच तिचे अस्तित्व संपविण्याचा हा अमानुष प्रकार थांबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे राहाता शहरासह शिर्डी मतदारसंघाची बदनामी होत आहे. प्रशासनाने तात्काळ विशेष पथक नेमून संबंधित रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रे व डॉक्टरांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. पिपाडा यांनी केली. 

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

डॉ. पिपाडा यांनी सांगितले की (Rajendra Pipada)

डॉ. पिपाडा यांनी सांगितले की, समाजातील मुलींचे प्रमाण टिकविणे व स्त्री भ्रूणहत्या रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अशा बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. समाजातील स्त्री भ्रूणहत्या व गर्भलिंग निदानासारख्या अमानुष प्रथांविरोधात कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या विषयावर पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला चौकशीचे निर्देश देऊन दोषींवरकठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.