Urban Planning Department : वाघुंडे बुद्रुकच्या लेकीची ‘भरारी’; मोहिनी रासकर नगररचना विभागाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम

Urban Planning Department : वाघुंडे बुद्रुकच्या लेकीची 'भरारी'; मोहिनी रासकर नगररचना विभागाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम

0
Urban Planning Department : वाघुंडे बुद्रुकच्या लेकीची 'भरारी'; मोहिनी रासकर नगररचना विभागाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम
Urban Planning Department : वाघुंडे बुद्रुकच्या लेकीची 'भरारी'; मोहिनी रासकर नगररचना विभागाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम

Urban Planning Department : पारनेर : काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि कुटुंबाची भक्कम साथ असेल, तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे पारनेर (Parner) तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक येथील मोहिनी संतोष रासकर हिने सिद्ध केले आहे. राज्य सरकारच्या नगररचना विभागाने (Urban Planning Department) घेतलेल्या लघुलेखक (वर्ग २) परीक्षेत मोहिनीने राज्यात चौथ्या आणि मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने हे यश संपादन केल्याने संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जागतिक महिला दिनाचे (Women’s Day) औचित्य साधून वाघुंडे बुद्रुक येथे मोहिनी रासकर हिचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राजेश्वरी दत्तात्रय दिवटे-कोठावळे यांच्या हस्ते मोहिनीचा सन्मान करण्यात आला.

नक्की वाचा : गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्याहे प्रकार संतापजनक : राजेंद्र पिपाडा

परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम महत्त्वाचा

यावेळी बोलताना राजेश्वरी दिवटे म्हणाल्या की, “मोहिनीचे यश हे केवळ रासकर कुटुंबाचा अभिमान नसून, ग्रामीण भागातील प्रत्येक मुलींसाठी एक मोठी प्रेरणा आहे. शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी असतानाही तिने मिळवलेले यश तिच्या अपार कष्टाचे फळ आहे.” सत्काराला उत्तर देताना मोहिनी भावूक झाली होती. तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबाला देत म्हटले, “माझ्या कुटुंबाने दिलेली प्रेरणा आणि खंबीर पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य आणि संयम अत्यंत महत्त्वाचा आहे.” ग्रामीण भागातील मुलींनी प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न पहावे आणि त्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहनही तिने यावेळी केले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Urban Planning Department)

मोहिनीच्या या यशामुळे वाघुंडे बुद्रुक गावाचे नाव राज्यपातळीवर चमकले आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवलेली ही झेप तरुणांसाठी आदर्श ठरत आहे. या सत्कार प्रसंगी चंद्रकला रासकर, साधना दिवटे, कल्पना पठारे, कल्पना गाडीलकर, शोभा गाडीलकर, पुष्पा गाडीलकर, साक्षी गडीलकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.