Accident : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली

0
Accident : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली
Accident : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली

Accident : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा (Kolgaon Phata) परिसरात मंगळवारी (ता. १०) रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास कांद्याचा ट्रक आणि तेल वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. हा अपघात इतका जोरदार होता की दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान (Damage) झाले आहे, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण

Accident : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली
Accident : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली

परिसरात मोठा आवाज

मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (ता. १०) रात्री ११ च्या सुमारास कांद्याने भरलेला ट्रक आणि तेल टँकर यांची कोळगाव फाटा येथे जोरदार धडक झाली. रात्रीची वेळ असल्याने आणि धडक भीषण असल्याने परिसरात मोठा आवाज झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, टँकरच्या पुढच्या केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. ट्रकमधील कांद्याची पोती रस्त्यावर विखुरलेली होती.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

काही काळ वाहतुकीवर परिणाम (Accident)

हा अपघात पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, दोन्ही वाहनांमधील चालक व क्लिनर या भीषण अपघातातून सुखरूप बचावले आहेत.रात्रीची वेळ असल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सध्या घटनास्थळावरून वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. बेलवंडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here