Local Crime Branch : दरोडाच्या तयारीतील संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : दरोडाच्या तयारीतील संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : दरोडाच्या तयारीतील संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : दरोडाच्या तयारीतील संशयित आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील मडगाव शिवारात दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेले चार संशयित आरोपी (Accused) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी असलेले साहित्य असा एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण

तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

छगन चिंतामण काळे (वय-४३, रा. तळेवस्ती कडा, ता.आष्टी, जि.बीड, महावीर पंढरीनाथ भोसले (वय- ३९, रा. शेरी खु ता. आष्टी जि. बीड, कदम चिंचावन काळे (वय- ३५, रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि.बीड), इदगर गारमन चव्हाण (वय- ३८ रा.. शेरी खु ता. आष्टी जि. बीड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

सापळा रचून संशयित आरोपींना घेतले ताब्यात (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किराणा कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार मदडगाव शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर जाणारे रोडवर पाण्याचे टाकीजवळ अंधारात काही व्यक्ती संशयीतरित्या हातामध्ये हत्यारे घेवुन उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकाने अहिल्यानगर तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता पसार झालेले त्यांचे साथीदार प्रविण हबाजी भोसले, प्रफुल्ल हबाजी भोसले (दोघे रा. पिंपरखेड ता. आष्टी जि.बीड), संतोष उर्फ सिंधुशा सुर्यभान काळे रा. गंगापुर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीगनर), असे असल्याचे सांगितले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सुनील मालणकर यांच्या पथकाने केली.