Local Crime Branch : नगर : कर्जत तालुक्यातील चापडगाव परिसरात अफूची (Opium) शेती करणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. तुझ्याकडून ४७ लाख ६४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात (Karjat Police Station) परमेश्वर बन्सी घनवट (वय- ६८, रा. चापडगाव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण
४७ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार चापडगाव शिवारातील शेती गट नं.१३ मध्ये प्रतिबंधित अफूची शेती केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली असता
शेतामधून तब्बल २३८. २३९ किलोग्रॅम वजनाचे प्रतिबंधित अफूची झाडे असा एकूण ४७ लाख ६४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
यांच्या पथकाने केली कारवाई (Local Crime Branch)
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, विजय पवार, अतुल लोटके, संतोष खैरे, अमृत आढाव, उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली आहे.



