Hindu Sammelan : श्रीगोंद्यात ‘हिंदू संमेलना’ला बहुजन संघटनांचा विरोध; पोलीस प्रशासनाला निवेदन

Hindu Sammelan : श्रीगोंद्यात ‘हिंदू संमेलना’ला बहुजन संघटनांचा विरोध; पोलीस प्रशासनाला निवेदन

0
Hindu Sammelan : श्रीगोंद्यात ‘हिंदू संमेलना’ला बहुजन संघटनांचा विरोध; पोलीस प्रशासनाला निवेदन
Hindu Sammelan : श्रीगोंद्यात ‘हिंदू संमेलना’ला बहुजन संघटनांचा विरोध; पोलीस प्रशासनाला निवेदन

Hindu Sammelan : श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात आयोजित ‘हिंदू संमेलना’ (Hindu Sammelan) विरोधात संभाजी ब्रिगेड, आरपीआय (RPI) (आठवले), वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि सत्यशोधक समाज यांसह विविध बहुजन संघटनांनी एकत्र येत विद्रोही पवित्रा घेतला आहे. “हिंदू संमेलनाच्या नावाखाली समाजात विष पेरू नका,” असा इशारा देत संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

नक्की वाचा : पाण्यापासून वंचित गावांसाठी उपसा सिंचन योजनेची मागणी; खताळ यांनी वेधले लक्ष

निलेश गायकवाड आणि अरविंद कापसे यांचा इशारा

संमेलनासाठी निमंत्रित ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. रामगिरी महाराजांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्यास त्यांचे तोंड काळे करण्याचा आणि चपलांचा हार घालण्याचा इशारा निलेश गायकवाड आरपीआय (आठवले) आणि अरविंद कापसे (संभाजी ब्रिगेड) यांनी दिला आहे. श्रीगोंदा ही संत शेख महंमद महाराजांची व सामाजिक ऐक्याची भूमी आहे. येथे धार्मिक तेढ निर्माण होऊ देणार नाही, असे संघटनांनी स्पष्ट केले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

वक्त्यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे (Hindu Sammelan)

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करावी, वक्त्यांकडून लेखी हमीपत्र घ्यावे आणि प्रक्षोभक भाषण झाल्यास तात्काळ ‘बीएनएस’ (BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. या पत्रकार परिषदेला निलेश गायकवाड, अरविंद कापसे, नानासाहेब शिंदे, सुनील ढवळे, प्रसाद भिवसने यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.