Sakhe Ga Saajani : ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव

0

Sakhe Ga Saajani : नगर : मराठी चित्रपट ‘सखे गं साजणी’ (Sakhe Ga Saajani) ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाचे शीर्षक गीत (Movie Title Song) नुकतेच प्रदर्शित झाले आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे अनोख्या पद्धतीने पुण्यातील एलप्रो मॉलमध्ये फ्लॅश मॉबच्या (Flash Mob) माध्यमातून प्रत्यक्ष प्रदर्शित करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या चाहत्यांनीही उत्साहाने या सादरीकरणात सहभागी होत वातावरण अधिक रंगतदार केले.

नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न

धमाल मैत्री आणि प्रवासातील मजेशीर क्षणांची झलक

या गाण्यात प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांची धमाल मैत्री आणि त्यांच्या प्रवासातील मजेशीर क्षणांची झलक पाहायला मिळते. सुंदर दृश्ये, नृत्य आणि उत्साही वातावरणामुळे हे गाणे चित्रपटातील मैत्रीचा आनंद अधिक खुलवते.

Sakhe Ga Saajani : ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव
Sakhe Ga Saajani : ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव

नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण

लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांनी गायले गाणे (Sakhe Ga Saajani)

हे गाणे लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांनी गायले असून, संगीत विजय भाटे यांनी दिले आहे. या गाण्याचे शब्द लखन चौधरी यांनी लिहिले असून, रॅपचे शब्द आणि सादरीकरण रोहन तुपे यांनी केले आहे. गाण्याचे संगीत संयोजन आणि निर्मितीही रोहन तुपे यांनी केली आहे.

Sakhe Ga Saajani : ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव
Sakhe Ga Saajani : ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे शीर्षक गीत पुण्यात फ्लॅश मॉबमधून प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाचा रंगतदार उत्सव

गाण्यातील शहनाई आणि क्लॅरिनेटचे सूर दुर्गेश भोसले यांनी साकारले असून, कोरस आणि पार्श्वगायन श्वेता ठाकूर, वैभवी पंचागणे आणि मानसी जगताप यांनी केले आहे. अतिरिक्त गायन ऋषभ साठे यांचे आहे. शहनाई आणि कोरसचे ध्वनिमुद्रण आलोप स्टुडिओ येथे कौशल व्हीजी यांनी केले असून, मुख्य गायनाचे ध्वनिमुद्रण एएमव्ही स्टुडिओ येथे हर्ष भोईर यांनी केले आहे. ध्वनिमुद्रण सहाय्यक म्हणून यश जोशी यांनी काम पाहिले आहे.

उत्साही संगीत, प्रवासाची मस्ती आणि कलाकारांची ऊर्जा यामुळे हे गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here