
Madhevadgaon Society : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील (Shrigonda Taluka) राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या (Madhevadgaon Society) अध्यक्षपदी बापूसाहेब आबासाहेब वाबळे, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बाजीराव झुंजुरुक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोसायटीच्या मावळत्या अध्यक्षा सुमन मानसिंग मांडे आणि उपाध्यक्ष शरद गंगाधर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resigns) दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी बी. बी. सिनारे यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.
नक्की वाचा : महागाई व गॅस दरवाढीविरोधात राहाता तहसीलवर महाविकास आघाडीचा एल्गार
पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न
अध्यक्षपदासाठी प्रकाश उंडे यांनी बापूसाहेब वाबळे यांचे नाव सुचवले, ज्याला शरद शिंदे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी भगवान कुरुमकर यांनी दत्तात्रय झुंजुरुक यांचे नाव सुचवले आणि त्याला वसंतराव साळवे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना वाबळे यांनी सर्वांना सोबत घेऊन संस्था आणि सभासदांचे हित जोपासत पारदर्शी कारभार करण्याचा माझा प्रयत्न राहील. यापूर्वीच्या पाच वर्षांच्या अध्यक्षपदाचा अनुभव भविष्यात संस्थेच्या प्रगतीसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.” असे सांगितले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Madhevadgaon Society)
यावेळी बोलताना कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष शिंदे म्हणाले की, “सहकार ही केवळ संस्था नसून ती विश्वास आणि एकत्रित प्रगतीची ताकद आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी अधिक सक्षम होऊन शेतकरी व सभासदांच्या हितासाठी आदर्श काम करेल.”नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे आणि जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, सोसायटीचे संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


