Sangram Jagtap | अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार संग्राम जगताप यांनी दिली माहिती

0
Sangram Jagtap
Sangram Jagtap

Sangram Jagtap | नगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने अहिल्यानगर शहर व केडगाव मधील रस्त्यांच्या व पुलाच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली. 

नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न

विकासकामांसाठी सातत्याने निधी मंजूर

अधिक माहिती देताना आमदार जगताप म्हणाले, राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील विकासकामांसाठी सातत्याने निधी मंजूर होत आहे. नव्याने मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधी मधून केडगाव वेश ते देवी मंदिर ते रेल्वे अंडर पास रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी ७ कोटीचा निधी, तसेच भूषणनगर लिंक रोड वरील डागवाले फार्म जवळील पुलाच्या रुंदीकरण व सुशोभीकरण कामासाठी ३ कोटीचा निधी, तसेच नगर शहरातील पुना रोडवरील उड्डाणपुलाखालील कोठी चौक ते एसबीआय चौक पावन हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी १५ कोटी रुपये निधी असा एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

हे पहा – वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर !

राज्यातील महायुती सरकारच्या सहकार्याने नगर शहरात मोठ्या वेगाने विकासकामे होत आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लागत आहेत, असेही आमदार संग्राम जगताप यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here