Four-wheeler set on fire | राहुरी : राहुरी (Rahuri) पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचा राग मनात धरून जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने चारचाकी वाहनावर पेट्रोल ओतून ते पेटवून (Four-wheeler set on fire) दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे शनिवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास घडली.
हेही वाचा – आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
आरोपी जामिनावर बाहेर
संदीप दगडू कोहकडे हे राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे कुटुंबासह राहत असून त्यांच्याकडे घरगुती वापरासाठी चारचाकी वाहन आहे. संदीप कोहकडे यांनी आरोपीवर यापूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा केला आहे. सध्या आरोपी जामिनावर बाहेर आहे. शुक्रवारी (ता. ६) रात्री संदीप कोहकडे व त्यांचे कुटुंबीय जेवण करुन घरात झोपलेले होते. त्यावेळी त्यांची चारचाकी वाहन घरासमोरील पटांगणात लावलेले होते.
अवश्य वाचा – अहिल्यानगर महापालिकेकडून भाड्याच्या उत्पन्नावर कर आकारणी; क्षेत्रफळानुसार आकारणी करण्याची शिवसेनेची मागणी
पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिले
शनिवारी (ता. ७) पहाटे १.३० वाजेच्या सुमारास संदीप कोहकडे यांना घराबाहेर काहीतरी आवाज आल्याने ते घराबाहेर आले. तेव्हा आरोपीने कोहकडे यांच्या वाहनावर पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिले. त्यानंतर तो तिथून पळून गेला. तेव्हा संदीप कोहकडे यांनी आरडा-ओरडा करुन त्यांच्या कुटुबियांना उठवले व त्यांनी पाण्याची मोटार चालु करुन गाडीवर पाणी मारुन गाडी विझवली. आरोपीने गाडी पेटुन दिल्यामुळे लागलेल्या आगीत वाहनाचे प्रचंड नुकसान झाले.
हे पहा – वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर!
पुढील तपास सुरू
या प्रकरणी संदीप दगडू कोहकडे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण बाबासाहेब कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (जी) प्रमाणे वाहन पेटवून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.



