People’s Court : श्रीगोंदा न्यायालयातील ‘लोकअदालत’ मध्ये आठ हजार प्रकरणांचा निपटारा

दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन लढाईमुळे आर्थिक नुकसान

0


People’s Court : श्रीगोंदा: जिल्हा न्यायालय श्रीगोंदा येथे आज (ता.१४) ‘राष्ट्रीय लोकन्यायालयाचे’ (People’s Court) आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित आणि खटलापूर्व अशा एकूण ७,९९६ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला असून, त्याद्वारे ६ कोटी ४३ लाख ८१ हजार ९३७ रुपयांची विक्रमी वसुली (Record recovery) झाली आहे. लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सामंजस्याने प्रकरणे निकाली काढल्यास वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होत असल्याने लोकन्यायालयात प्रकरणे निकाली काढण्याचे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी पक्षकारांना आवाहन केले. 

अवश्य वाचा-  आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन लढाईमुळे आर्थिक नुकसान (People’s Court)

दिवाणी न्यायाधीश एस. पी. केकाण यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विषद करताना सांगितले की, दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन लढाईमुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होतो, जो तडजोडीने टाळता येते. या लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, भू-संपादन, कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी गुन्हे.खटलापूर्व प्रकरणे ग्रामपंचायत, नगरपालिका, बँक आणि महावितरण विभागाची थकबाकी प्रकरणे दाखल करण्यात आली होती. यावेळी जिल्हा न्यायाधीश-२ एस. एच. साळुंखे, दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) श्रीमती सी. व्ही. शिरसाठ, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) आर. बी. खवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी. जी. इंगळे यांच्यासह वकिलांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, विविध बँकांचे अधिकारी, नगरपरिषद व महावितरणचे कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते.