LPG Cylinder Black Marketing | गॅसचा काळाबाजार; राज्यातून ८६१ तर अहिल्यानगरमधून ४५ सिलेंडर हस्तगत

0

LPG Cylinder Black Marketing | नगर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात दोन दिवसांपासून घरगुती गॅस टंचाई विरोधात पुरवठा विभाग, गॅस कंपन्यांचे अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राज्यात आतापर्यंत एलपीजी गॅस सिलेंडर काळाबाजारात (LPG Cylinder Black Marketing) विक्री होणाऱ्या ८६१ गॅस सिलिंडरसह १४ ठिकाणी गॅस रिफीलींग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १३ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील जप्त केलेल्या गॅस सिलेंडरची संख्या ४५ झाली आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – श्रीगोंदा न्यायालयातील ‘लोकअदालत’ मध्ये आठ हजार प्रकरणांचा निपटारा

घरगुती गॅसची टंचाई सदृष्य परिस्थिती

याबाबत पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात युध्दामुळे घरगुती गॅसची टंचाई सदृष्य परिस्थिती ओढावली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महसूल, पुरवठा विभाग आणि गॅस कंपनीचे अधिकारी कर्मचारी आता मैदानात उतरले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसत आहे. गॅस टाक्यांचा काळाबाजार सुरू असल्याच्या घटना समोर येतांना दिसत आहे. दरम्यान दोन दिवसांत गॅसच्या काळाबाजार विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत राज्यात १ हजार ५५५ हॉटेल, चहा टपऱ्या आणि ढाबे तपासण्यात आले आहेत. यात ८६१ ठिकाणी काळाबाजारातील गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १३ लाख १२ हजार असून १४ ठिकाणी गॅस रिफीलींग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ७ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

अवश्य वाचा – उन्हाळ्यात झपाट्याने वाढतयं वीज बिल? फक्त 5 ट्रिक्स ज्यामुळे लागेल ‘ब्रेक’

गॅस एजन्सीची तपासणी

अहिल्यानगर शहरात शनिवारी (ता. १४) जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काही गॅस एजन्सीची तपासणी केली. तसेच त्या ठिकाणी बुकिंगनुसार टाक्यांचे वाटप होते की नाही, याची पाहणी केली. तर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी राहुरी तालुक्यात विविध हॉटेलमधून ११ गॅस टाक्या जप्त केल्या. जिल्ह्यात २६९ ठिकाणी हॉटेल तपासणी करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here