Rape | कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0

Rape | पारनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ढवळपुरी येथे वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केला तसेच पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी कीर्तनकाराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा – श्रीगोंदा न्यायालयातील ‘लोकअदालत’ मध्ये आठ हजार प्रकरणांचा निपटारा

पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून अत्याचार

पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून अत्याचार व छळ सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत होता. दोन्ही कुटुंबात सलोख्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने २०११ पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

अवश्य वाचा – उन्हाळ्यात झपाट्याने वाढतयं वीज बिल? फक्त 5 ट्रिक्स ज्यामुळे लागेल ‘ब्रेक’

जीवे मारण्याची धमकी

​पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी धमकी तो देत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ सहन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

​घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीती पोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेला चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पारनेर पोलिसांनी या प्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. आरोपी यशवंत महाराज थोरात यांना पारनेर पोलिसांनी अटक केली. या अशा ‘भोंदू’ महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पारनेर येथील पोलीस अधिकारी करत आहेत.

हे पहा – या समुद्रधुनीला ‘होर्मुझ हे नाव कसं पडलं? त्याचा नेमका अर्थ काय?

ढवळपुरी येथे शनिवार (ता. १४) रोजी यशवंत महाराज थोरात यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करत आरोपी यशवंत महाराज थोरात यांना आज (ता. १५) पहाटे चार वाजता ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मारग हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here