Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गसह श्रीगोंदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गसह श्रीगोंदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

0
Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गसह श्रीगोंदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा
Nagar-Daund Highway : नगर-दौंड महामार्गसह श्रीगोंदा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

Nagar-Daund Highway : श्रीगोंदा : तलुक्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. रस्त्यासाठी वापरण्यात येणारे सिमेंट आणि खडीचे मिश्रण (Crushed Stone Mixture) (खडीमिश्रित काँक्रीट) नगर-दौंड महामार्गासह (Nagar-Daund Highway) पारगाव फाटा ते श्रीगोंदा (Shrigonda) या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडले आहे. मिक्सर मधील खडी रस्त्यावर सांडल्याने अनेक दुचाकीस्वार खडीवरून घसरून गंभीर जखमी झाल्याचे प्रकार समोर येत आहे.

नक्की वाचा : धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

दुचाकींचे नियंत्रण सुटून अपघात

श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील रस्त्यासाठी आवश्यक असणारे डी एल सी आणि कॉंक्रिटीकरण करण्यासाठी पारगाव फाटा परिसरात मिक्सर ट्रक्स आणि डंपर यांच्या सहाय्याने रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. मात्र, हे मटेरियल वाहून नेताना डंपरमधून खडी आणि सिमेंटचे मिश्रण रस्त्याच्या मध्यभागी आणि कडेला सांडत आहे. सांडलेली  खडी सुटी झाल्याने रस्त्यावर दुचाकींचे नियंत्रण सुटून अपघात होत आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी (Nagar-Daund Highway)

रस्त्यावर सांडलेली ही खडी अचानक समोर आल्याने गाडी घसरून अपघात होत आहेत. यामध्ये काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत, तर काहींना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे. रस्त्यावर सांडलेली ही खडी साफ करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करत आहेत. विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या जिवाची सुरक्षा रामभरोसे आहे. ही सांडलेली खडी तातडीने साफ करावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.