Poster Competition : राजळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश; राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत पटकविला द्वितीय क्रमांक

Poster Competition : राजळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे यश; राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत पटकविला द्वितीय क्रमांक

0

Poster Competition : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील लोकनेते आप्पासाहेब राजळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील (Appasaheb Rajale Pharmacy College) द्वितीय वर्ष औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी श्रद्धा वाळके व बुश्रा मनियार यांनी राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर स्पर्धेत (Poster Competition) द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. ही स्पर्धा सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या (Mula Education Society) औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.

अवश्य वाचा- धक्कादायक! तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज यांनी स्वतःवरच केले वार…

संकल्पनेला परीक्षकांकडून विशेष दाद

या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी भाज्या व नैसर्गिक औषधी कच्च्या द्रव्यांमधील कीटकनाशकांचे प्रमाण शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहून नेता येणाऱ्या उपकरणाच्या निर्मितीचा अभ्यास या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाज्या तसेच नैसर्गिक औषधी कच्च्या द्रव्यांमधील कीटकनाशकांचे प्रमाण ओळखण्यासाठी तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाहून नेता येणाऱ्या उपकरणाच्या संकल्पनेला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

मोनिका राजळे यांच्याकडून विद्यार्थिनींचे अभिनंदन (Poster Competition)

या यशासाठी विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. खणगे तसेच प्रा. रामचंद्र हंडाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे व बी. एम. गोरे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनींचे कौतुक केले.