Movement: शेवगाव येथे तहसील कार्यालयात आंदोलन; मोफत भाजीपाला वाटप करून निषेध

भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

0

Movement: शेवगाव: भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना फक्त ११ वाजेपर्यंत बसण्याची मर्यादा घालून देण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयाविरोधात आज (ता.१६) शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन (Movement) करण्यात आले. यासंदर्भात ५ जून रोजी तहसीलदार यांना मोफत भाजीपाला वाटप आंदोलनाचे निवेदन (statement) देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही नगरपरिषदेच्या निर्णयात कोणताही बदल न झाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयात मोफत भाजीपाला वाटप करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अवश्य वाचा- राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक

भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा (Movement)

यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना भाजी मंडईमध्ये दिवसभर बसून आपला भाजीपाला विक्री करण्याची परवानगी द्यावी, तसेच शेतकऱ्यांना जबरदस्तीने हाकलून देण्याची प्रथा तात्काळ बंद करावी, अशी मागणी केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, वंचित आघाडीचे प्यारेलाल शेख, मराठा संघाचे राजू घनवट, दहिफळाचे सरपंच बाळासाहेब शिंदे, काँग्रेसचे समद काझी, बाबुलाल शेख, संतोष कांबळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.