Pakistan–Afghanistan War : अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला; 400 ठार

Pakistan–Afghanistan War : अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला; 400 ठार

0
Pakistan–Afghanistan War : अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला; 400 ठार
Pakistan–Afghanistan War : अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला; 400 ठार

Pakistan–Afghanistan War : नगर : सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पाकिस्तान – अफगाणिस्तान युद्धातून (Pakistan–Afghanistan War) एक मोठी अपडेट समोर येत आहे. या अपडेटनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला 250 पेक्षा जास्त नागरिक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानने एका रुग्णालयावर बॉम्ब टाकले असल्याचा दावा अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काबुलमधील विविध लष्करी तळांना टार्गेट करण्यात आले असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

व्यसनाधीन व्यक्तींवरील उपचार केंद्र

‘टोलो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या या हल्ल्यांमध्ये 400 हून अधिक लोकांचा (Pakistan Airstrikes On Afghanistan) मृत्यू झाला आहे. ज्या रुग्णालयाला कथितरित्या टार्गेट करण्यात आले, ते अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेने ग्रस्त असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्याचे केंद्र (Kabul Hospital) होते. तर दुसरीकडे पाकिस्तानने तालिबानने केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानचा असा दावा आहे की, त्यांनी पूर्व अफगाणिस्तानमधील कोणत्याही नागरी ठिकाणाला टार्गेट केले नाही.

Pakistan–Afghanistan War : अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला; 400 ठार
Pakistan–Afghanistan War : अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हवाई हल्ला; 400 ठार

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाकिस्तानने आरोप फेटाळले (Pakistan–Afghanistan War)

तालिबान सरकारचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण होते. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. त्यांनी ठामपणे सांगितले की, काबुलमधील कोणत्याही रुग्णालयाला टार्गेट करण्यात आले नाही.

एका पोस्टमध्ये, पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने नमूद केले की, त्यांच्या लष्कराने केलेले हवाई हल्ले हे केवळ लष्करी तळांवर आणि दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या पायाभूत सुविधांवर अत्यंत अचूकपणे केंद्रित होते. त्यांनी पुढे सांगितले की, अफगाण तालिबानशी संबंधित तांत्रिक उपकरणे आणि दारूगोळा साठवलेली गोदामे (डेपो) हे देखील या टार्गेटमध्ये समाविष्ट होते.