Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लागावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू

Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लागणाऱ्या सागर मोहोळकराचा मृत्यू…

0
Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लागणाऱ्या सागर मोहोळकराचा मृत्यू…
Sagar Moholkar Death : घायवाळच्या कानशिलात लागणाऱ्या सागर मोहोळकराचा मृत्यू…

Sagar Moholkar Death : नगर : जिल्ह्यातील जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबाराची (Firing) घटना घडली होती. गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकर (Sagar Moholkar Death) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून सागर मोहोळकर हा मृत्यूशी झुंज देत होता.

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना 9 मार्च रोजी घडली होती. त्याच्या तोंडातही गोळी (Bullet) लागल्याची माहिती होती. त्याच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला होता. त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या.

नक्की वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार

गोळीबार करणारे दोन आरोपी ताब्यात

सागरला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. घटनेचा तपास पोलीस पथकाने सुरू केला व तातडीने तपासाचे चक्र फिरवले. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जामखेड येथील अभिमन्यू याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये गोळीबार करणाऱ्या पुणे येथील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या या आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती असून यामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोहोळकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल (Sagar Moholkar Death)

नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचा तपास सुरू केला होता. सागर मोहळकर याने कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेदरम्यान घडली होती. तेव्हापासून सागर मोहोळकर हा चांगलाच चर्चेत आला होता. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्यानुसार नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.