Laxman Hake: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शिवाजीराव कर्डीले या दोन नेत्यांचे निधन झाल्याने बारामती (Baramati) व राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोटनिवडणूक जाहीर (Baramati Assembly Election) झाली आहे. २३ एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake ) यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत येथील निवडणूक बिनविरोध करण्यास विरोध दर्शवला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना विधान परिषदेवर घ्यावं, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यात १७ ते १९ मार्च कालावधीत वादळी पावसाची शक्यता
नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके? (Laxman Hake)
सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभाला उमेदवार द्यावा, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो,असं हाके यांनी म्हटलं आहे. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा, असंही ते म्हणाले. राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवलं आहेच. मग सुनेत्रा पवार यांना देखील विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा. मी उमेदवार असेन असं नाही, येथील लोकलचा उमेदवार देखील निवडणूक लढवू शकतो, असं हाके म्हणाले.
अवश्य वाचा: घायवाळच्या कानशिलात लागावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू
लक्ष्मण हाकेंकडून निवडणूक लढवण्याची तयारी (Laxman Hake)
२८ जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर होणारी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे. आपण निवडणूक लढवावी, यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह असल्याचं ते म्हणाले. तसेच अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं होतं.



