
शिवदुर्गने गाठली ट्रेकिंग विश्वातील शतकिय उंची
शिवकार्य शिवाई देवीच्या चरणी अर्पण
Shivdurg Trekkers Foundation : श्रीगोंदा : गडकिल्ले ट्रेकिंग विश्वातील विश्वासाचे मानदंड म्हणजे शिवदुर्ग परिवार. किल्ले धर्मवीरगड (Dharmaveergad) ते किल्ले शिवनेरी (Shivneri Fort) अखंड परिक्रमा. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन (Shivdurg Trekkers Foundation) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश इंगळे (Rajesh Ingle) यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनात प्रत्येक महिन्याला एका गडकिल्याची अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी पायधूळ घेतली. किल्ले धर्मवीरगड येथे स्थापनेपासुन २०१८ ते २०२६ या ९ वर्षात १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती करुन गडकिल्ले, वारसा संवर्धन क्षेत्रांतील नामांकित संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून शिवविचारांची मोठी उंची गाठली आहे.
नक्की वाचा : राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ने घेतलेला सद्यस्थितीचा आढावा

गडकिल्ले हे आपले वैभव
अनेक अडथळे व संघर्षावर मात करत तरुणाईसाठी छत्रपती शिवरायांचा नवा शिवविचार देऊन समाजात एक वेगळा शिवविचार व आदर्श निर्माण करण्यात शिवदुर्ग परिवार यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रातील गडकोट भटकंती व सह्याद्रीच्या कातळकड्यांची अद्भुत थरारक गाथा, तिन्ही ऋतुंतील गडावरील वातावरण, प्रत्येक वेळी गड नवीनच भासतो. शिवकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. गडकिल्ले हे आपले वैभव आहे, वारसा आहे. संस्कृती आहे, इतिहास आहे. आणि हा इतिहास जपायचे काम सहकुटुंब सहपरिवार अनुभवनारा परिवार म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने काल शिवजन्मस्थळी मानदंड रोवला. आजपर्यंत केलेले शिवकार्य शिवाई देवीच्या चरणी अर्पण केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

१०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती (Shivdurg Trekkers Foundation)
नविन शतकी मोहिम म्हणजे नवी दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. अशी भावना सर्वांनीच व्यक्त केल्या. शिवविचार ठोस खंबीर नेतृत्व स्वयंशिस्त, आचारसंहिता बनवुन तेरा जिल्ह्यातील १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती करणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर सदस्यांचा सहभाग शिवदुर्ग मध्ये आहे.शिवदुर्ग चे कार्य हे ना नफा ना तोटा तत्वावर आधारित असते. तरुणाई, मुले-मुली, महिला, गृहिणी, पालक, वयोवृध्द, सर्वांच्या विश्वासात पात्र. ठरलेला परीवार म्हणून जन माणसांत शिवदुर्गची ओळख निर्माण झाली आहे.
मिडीयाचा मोठा वाटा
शिवदुर्गने सह्याद्रीची ऊंची गाठण्यात शिवदुर्ग संचालक मंडळ, शिवदुर्ग शिलेदार राज्य कार्यकारीणी, महिला रणरागिणी, सर्व अबालवृद्ध सदस्य, शुभहितचिंतक, मिडीयाचा मोठा वाटा व १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती आहे. गडकिल्ले संवर्धन व वारसा संवर्धन बाबत लवकरच महाराष्ट्रातील नामवंत इतिहास व वारसा जतन मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल ठरविण्यात येणार आहे.


