Rahuri Assembly Constituency : राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निरीक्षक पदी ऋतुराज रवी यांची नियुक्ती

Rahuri Assembly Constituency : राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निरीक्षक पदी ऋतुराज रवी यांची नियुक्ती

0

Rahuri Assembly Constituency : नगर : राहुरी विधानसभा (Rahuri Assembly Constituency) मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणूक जाहीर केलेली आहे. निवडणूक कालावधीत निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत, निर्भय, निष्पक्ष व पारदर्शी वातावरणामध्ये पार पडण्याकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक निरीक्षक म्हणून मेघालय येथील आयपीएस अधिकारी ऋतुराज रवी (Ruturaj Ravi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नक्की वाचा : राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ने घेतलेला सद्यस्थितीचा आढावा

निवडणूक निरीक्षक यांच्या वतीने कळविण्यात आले की

राहुरी निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या, मतदारांच्या किंवा राजकीय पक्षांच्या काही तक्रारी असतील तर निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क करावा तसेच निवडणूक निरीक्षक हे निरीक्षण बंगला, व्हीआयपी रेस्ट हाऊस संभाजीनगर रोड अहिल्यानगर येथे रोज सकाळी ११ वाजता भेटू शकतात असे निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

व्यवस्थापन व कारवाईमुळे लोकप्रीय (Rahuri Assembly Constituency)

सदरचे निवडणूक निरीक्षक हे राहुरी विधानसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतील तसेच मतदान केंद्र आणि इमारती, एसएसटी, फ्लाईंग स्कॉड यांना भेट देण्याची शक्यता आहे. ऋतुराज रवी हे २०१३ बॅचचे मेघालय कॅडरचे अधिकारी असुन त्यांनी पुर्व खासी आदिवासी टेकड्या भागामध्ये उत्कृष्ट कर्तव्य बजावले आहे. तसेच शिलॉंग येथे ट्राफिक व्यवस्थापन व कारवाईमुळे लोकप्रीय आहेत.