Kashinath Date | नगर : पारनेर (Parner) तालुक्यातील ढवळपुरी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार प्रकरणी पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते (Kashinath Date) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत ठाम व आक्रमक भूमिका मांडली.
नक्की वाचा : राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीचा ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ने घेतलेला सद्यस्थितीचा आढावा
घटनाक्रम सभागृहात मांडला (Kashinath Date)
अधिवेशनात बोलताना आमदार दाते यांनी संबंधित घटनेचा घटनाक्रम सभागृहासमोर मांडताना सांगितले की, ढवळपुरी गावातील दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असलेला कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० मार्च २०२६ रोजी उघड झाली असून सबंधित मुलगी आठवीत शिकत आहे. आरोपीने पीडित मुलीच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर सातत्याने अत्याचार करत आलेला आहे.
अवश्य वाचा – वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
महाराजाने चार विवाह (Kashinath Date)
यापूर्वी मी दोन हाफमर्डर केले असल्याचे सांगत तू कुणालाही सांगितले तरी तुझ्या आई-वडिलांना व भावाला मारून टाकीन अशी भीती दाखवत संबंधित आरोपीने ढवळपुरी व परिसरातील काही महिला व युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व पैशाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या तथाकथित महाराजाने चार विवाह केलेले आहेत. घटना घडली त्या दिवशी सबंधित आरोपीने या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिला बांबू व इतर साधनाने मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर स्वयंपाक करण्याची पक्कड गरम करून त्याचे चटके तिला दिले आहे. ज्यामुळे त्या मुलीला चालणेही अवघड झाले आहे.
पीडितेचा छळ (Kashinath Date)
दरम्यानच्या काळात पीडितेला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला. आरोपीने तिला धमकावून गेली तीन वर्ष हा प्रकार लपवून ठेवला, मात्र अखेर धैर्य एकवटून पीडितेने घडलेला प्रकार उघड केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर ढवळपुरी गावासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
“अशा विकृत प्रवृत्तीला कोणतीही माफी नाही. संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेला तातडीने न्याय मिळावा यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी ठोस मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून अशा घटनांवर कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असल्याचे ठाम मत आमदार दाते यांनी यावेळी व्यक्त केले.
दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार (Kashinath Date)
मागील आठवड्यात कान्हूर पठार येथील दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली असतानाच पुन्हा ही घटना घडलेली आहे. पारनेर तालुक्यात सध्या महिलावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली.



