Madhi | मढीतील फुलोर बाग यात्रेला कावडींचा जलाअभिषेक; निशाण भेटीचा सोहळा ठरला आकर्षण

0

Madhi | पाथर्डी : मढी (Madhi) येथे फुलोरबाग यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो कावडधारकांनी पवित्र जलाने चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीला जलाभिषेक केला. ‘गंगामाई की जय, हरहर महादेव, अलख निरंजन, चैतन्य कानिफनाथ महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

हे वाचा – आश्वासनानंतर लोणी व्यंकनाथ येथील ‘रास्ता रोको’ मागे

भाविकांनी गर्दी केली

चैतन्य कानिफनाथ यात्रेचा शेवटचा टप्पा पारंपरिक उत्साहात व शांततेत पार पडला. बुधवारी सायंकाळी निशाण भेटीचा वैशिष्ट्यपूर्ण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. विश्वस्त समितीच्या नियोजनामुळे यंदा कावडधारकांना कोणताही त्रास न होता जलाभिषेक करता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

अवश्य वाचा- वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

प्रतीकात्मक घोडा व पालखी निशाण भेट

फुलोरबाग हा यात्रेतील अंतिम टप्पा असून मढी परिसर जयघोष व डफ-ताशांच्या निनादाने दुमदुमला. निवडुंगे शिवारात यात्रा संपल्यानंतर मानाची निशाणे व कावडी लक्ष्मी आई मंदिराजवळ आणण्यात आली. त्याचवेळी गडावरून पंचधातूचा प्रतीकात्मक घोडा व पालखी निशाण भेटीसाठी दाखल झाली. निशाणाचे टोक पालखीला स्पर्श होताच भाविकांनी जयजयकार करत वातावरण भारावून टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here