Amol Khatal : अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा : अमोल खताळ

Amol Khatal : अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा : अमोल खताळ

0
Amol Khatal : अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा : अमोल खताळ
Amol Khatal : अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा : अमोल खताळ

Amol Khatal : संगमनेर : तालुक्यातील एका गावात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेला अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला (Police) दिल्या.

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

पीडित मुलीची भेट

आमदार खताळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी भेट देत सविस्तर पाहणी केली व घटनेची माहिती घेतली. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार खताळ यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली व तिच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी योग्य उपचार सुरू असून मुलीची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Amol Khatal)

खताळ यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, गणेश काशीद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.