नगर : भर ऊन, अंगात घाम आणि सहा महिन्यांचं बाळ (Six-month-old baby) घेऊन एका हिरकणीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो शिवनेरी किल्ला (Shivneri Fort) सर केला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. शिवनेरीच्या पायऱ्या चढताना या माऊलीचे पाय जराही डगमगले नाहीत. छत्रपतींचा कोणताही किल्ला चढताना सामान्य माणसाची दमछाक होते, इथे तर अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन एक आई शिवनेरी चढली (Mother climbs Shivneri with her six-month-old baby) आहे. या चिमुरडीला घेऊन चढाई करणाऱ्या सुप्रिया गणेश कुदांडे (Supriya Kudande) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नक्की वाचा: अग्नितांडवातून आजीने वाचविले नातींचे प्राण;प्रकरण नेमकं काय?
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या वतीने १०० वी गडकोट मोहीम शिवनेरीवर (Shivdurg Trekkers Foundation)

१५ मार्चला शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या वतीने १०० वी गडकोट मोहीम पार पडली. ही १०० वी मोहीम शिवनेरीवर नेण्यात आली. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील सुप्रिया कुदांडे या हिरकणीने आपल्या सहा महिन्यांच्या ‘आवली’ या चिमुरडीला घेऊन रखरखत्या उन्हात शिवनेरी सर करण्याचा विक्रम केला आहे. सुप्रिया यांनी यापूर्वी देखील आपली दुसरी मुलगी ‘अदिरा’ ही अवघी सात महिन्यांची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणारे कळसुबाई शिखर पार केलं होत.सुप्रिया यांना तीन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी अन्वीला देखील महाराजांचे गड-किल्ले पाहण्याची आवड आहे.
अवश्य वाचा: ॲसिड हल्ला झाल्यास त्वरित काय उपाय करावेत ? वाचा सविस्तर…
सहा महिन्याच्या लेकीला शिवनेरीवर नेण्याचा सुप्रिया यांचा धाडसी निर्णय (Shivdurg Trekkers Foundation)

सुप्रिया कुदांडे या गडकोट संवर्धन आणि भ्रमंतीसाठी अग्रेसर असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या संचालिका आहेत. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रिया व त्यांचे पती गणेश कुदांडे यांनी अनेक गडकिल्ले सर केले आहेत. छत्रपतींचे गड-किल्ले पाहण्याची आवड आई वडिलांच्याच रक्तात असल्याने आवली या लहान चिमुकलीने सुद्धा हसत हसत हा शिवनेरी पार केला असं म्हणता येईल. भर उन्हात सुप्रिया यांनी आपल्या सहा महिन्याच्या लेकीला शिवनेरीवर नेण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे.
शिवविचारांची परंपरा पुढे नेत १३ जिल्ह्यातील १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती करणारी संस्था म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने मोठा नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेने ८ मार्चला शिवजन्मस्थळी मानदंड रोवला. आजपर्यंत केलेले शिवकार्य त्यांनी शिवाई देवीच्या चरणी अर्पण केले. शिवदुर्ग फाउंडेशनने किल्ले धर्मवीरगड येथे स्थापनेपासुन २०१८ ते २०२६ या ९ वर्षात १०० गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती करुन गडकिल्ले, वारसा संवर्धन क्षेत्रांतील नामांकित संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. मात्र त्यांच्या या १०० व्या मोहिमेत सहा महिन्यांची आवली सुद्धा सहभागी झाल्याने शिवदुर्गची ही मोहीम अभिमानास्पद ठरली आहे.



