Diesel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलही महागले; नवीन दर काय?

0
Diesel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलही महागले; नवीन दर काय?
Diesel Price Hike : पेट्रोलनंतर आता डिझेलही महागले; नवीन दर काय?

नगर: इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेत (Iran, Israel, and the United States) मागील काही दिवसांपासून युद्ध (War) सुरू आहे. हे युद्ध अजून किती दिवस सुरु राहील हे काही सांगता येत नाही. त्याचा परिणाम इंधन आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर झाला आहे. देशात गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये देखील दरवाढ (Price hike in petrol and diesel) दिसून आली.

नक्की वाचा: साखर सम्राटांची मनमानी! शेतकऱ्यांची ५१८ कोटी एफआरपी थकवली 

डिझेलची किंमत प्रति लिटर २१.९२ रुपयांनी वाढली (Diesel Price Hike)

राज्यात साध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र स्पीड पेट्रोलच्या दरात २ रुपयांची वाढ दिसून आली. सोलापुरातील पेट्रोल पंपावर साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. साधे पेट्रोल १०४ रूपये तर स्पीड पेट्रोल १११ वरून ११३ रूपये झाले. साधं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्याच आहेत. मात्र स्पीड पेट्रोल २ रुपयांनी वाढले आहे. तसेच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इंडस्ट्रियल डिझेलची किंमत वाढवली आहे. या डिझेलची किंमत ८७.६७ रुपयांहून थेट १०९.५९ प्रति लिटरवर पोहचली आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर २१.९२ रुपयांनी वाढल्याने त्याचा थेट परिणाम उद्योग विश्व, वाहतूक आणि वीज उत्पादनावर होणार आहे.

अवश्य वाचा: आधुनिक हिरकणी! ६ महिन्याच्या चिमुरडीला घेऊन सर केला शिवनेरी किल्ला

IOC ने इंडस्ट्रियल डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. या डिझेलची किंमत काल(ता.१९) ८७.६७ प्रति लिटर होती. तर नवीन किंमत आता १०९.५९ रुपये प्रति लिटरवर पोहचल्या आहेत. एकाच फटक्यात २१. ९२ प्रति लिटर वाढ झाली. इंडस्ट्रीयल डिझेलला High Speed Diesel असेही म्हणतात.साधारण वाहनात या डिझेलचा वापर करण्यात येत नाही. तर औद्योगिक कामासाठी त्याचा वापर करण्यात येतो. Industrial किंवा Bulk Diesel म्हणून त्याची विक्री होते.

आखाती देशात कच्चा तेलाचा भाव घसरला (Diesel Price Hike)

आखाती देशात काल (ता.१९) कच्चा तेलाचा भाव घसरला. क्रूड ऑईल ११९ डॉलर प्रति बॅरलपेक्षा १४ डॉलर प्रति बॅरलने स्वस्त झाले. तर अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयचा भाव गुरुवारी १००डॉलर प्रति बॅरलहून अजून घसरला. हे इंधन ८ डॉलर प्रति बॅरल इतके कमी झाले आहे.