Nilesh Lanke : नगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या लोडशेडिंगविरोधात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी महावितरण (Mahavitaran) कार्यालयात ठिय्या आंदोलन (movement) करत प्रशासनाला धारेवर धरले. वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी व महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत त्यांनी सायंकाळच्या ६ ते १० वाजेपर्यंतच्या वेळेतील लोडशेडिंग तत्काळ बंद करण्याची मागणी केली.
नक्की वाचा : पाथर्डी तालुक्यात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; दहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बिबट्याच्या भीतीमुळे अंधारात राहणे धोकादायक
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान खासदार लंके यांनी स्पष्ट इशारा दिला की, “सायंकाळी होणारे लोडशेडिंग तत्काळ थांबवावे, अन्यथा महावितरणचे कार्यालय बंद करण्यास भाग पाडू.खासदार लंके यांनी सांगितले की, “लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात बिबट्याच्या भीतीमुळे अंधारात राहणे धोकादायक ठरत आहे.”या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यामध्ये समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लंके म्हणाले की (Nilesh Lanke)
सरकारवर टीका करत खासदार लंके म्हणाले की, “लोडशेडिंग करून शेतकऱ्यांची मुले गुरांमागे पाठवायची का? त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का?” दरम्यान, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले की, वीज चोरी हा गंभीर प्रश्न आहे तो नियंत्रणात आल्यानंतर २४ तास वीज पुरवठा शक्य होईल. शक्य तितक्या प्रमाणात लोडशेडिंग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. यावेळी नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ”या आंदोलनावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, प्रा. सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, श्रीकांत जगदाळे, अमोल खाडे, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब काळे, पोपट पुंड, उद्योजक अल्ताफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी तसेच जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार हेही उपस्थित होते



