Veerabhadra Yatra : राहाता : शहरातील ग्रामदैवत वीरभद्र (Veerabhadra Yatra) व नवनाथ यात्रा वर्गणीची सुरुवात गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) नारळ वाढवून करण्यात आली यावेळी यात्रा उत्सव हा पारंपारिक व सर्वांना आदर्शवत ठरेल अशा पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय यात्रा कमिटीच्या (Yatra Committee) वतीने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सढळ हाताने वर्गणी देऊन यात्रेत आपला व आपल्या परिवाराचा सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी कमिटीच्या वतीने करण्यात आले. शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराज व नवनाथ देवता यांचा यात्रा उत्सव (ता. २) व (ता. ३) एप्रिलला होणार असल्याने त्यासाठी यात्रा उत्सवाच्या वर्गणीची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रामस्थांच्या हस्ते म्हसोबा मंदिर येथे नारळ वाढवून करण्यात आली.
नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल
मागील वर्षाचा हिशोब दाखवला वाचून
यावेळी ट्रस्ट अध्यक्ष जबाजी मेचे यांच्या वतीने माजी अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी मागील वर्षाचा हिशोब वाचून दाखवला. यामध्ये मागील वर्षात ५६ लाख देणगी जमा झाली त्यात यात्रा वर्गणी १७ लाख रुपये मिळाले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंदिराच्या आतील गाभाऱ्यात नक्षीकाम करण्यासाठी व बाहेरील बाजूस सुशोभीकरण साठी ३० लाख रुपयाची मदत केली. तसेच गळवंती वर्गणी पावती, दक्षिणापेटी इत्यादी मधून सुद्धा वर्गणी जमा झाल्याचे निधाने यांनी सांगितले.यावेळी नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर, ॲड.रघुनाथ बोठे, ॲड नारायणराव कार्ले, मुकुंदनाना सदाफळ, दत्ता सदाफळ, इत्यादींनी चर्चेत भाग घेऊन मार्गदर्शन केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Veerabhadra Yatra)
यावेळी वीरभद्र देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय सदाफळ, विश्वस्त चांगदेव गिधाड ,सागर सदाफळ, प्रवीण सदाफळ ,राजेंद्र गायकवाड, रावसाहेब धूमसे, दिलीप वाघ,सचिन बोठे, सुरेश बोठे, चांगदेव गाडेकर, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर गाडेकर, मिलिंद गाडेकर, बाळासाहेब सोनटक्के, सुधाकर कुंभकर्ण, सचिव अरविंद गाडेकर, सर्जेराव भगत, रामनाथ भगत, राजेंद्र वाबळे, भगवान टिळेकर, शिवाजी आनप, बाळासाहेब सदाफळ, नगरसेवक राहुल सदाफळ, मुन्नाभाई शहा, प्रवीण बोरकर, मयूर पाळंदे, अजय आग्रे,अजय बोठे, शुक्लेश्वर शेळके, सर्जेराव मते ,भानुदास बोठे डॉ.महेश गव्हाणे, तुषार सदाफळ,अण्णासाहेब लांडबिले,वीरेश बोठे,ज्ञानेश्वर मेहत्रे,प्रदीप बनकर,रवी मेहेत्रे, गजानन बोर्डे, दिलीप सदाफळ, विष्णू गिधाड ,राजेंद्र सदाफळ ,ज्ञानेश्वर गाडेकर शिवाजी बनकर ,राजेंद्र जेजुरकर, उदय बोठे, बाळासाहेब गाडेकर, संतोष लोढा, सुरेश निकाळे, अशोक वाबळे ,गणेश बनकर, नेमिचंद लोढा, दत्तात्रय बोरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



