Bus Conductor Death : कर्तव्य बजावताना एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; संगमनेर आगारावर शोककळा

Bus Conductor Death : कर्तव्य बजावताना एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; संगमनेर आगारावर शोककळा

0
Bus Conductor Death : कर्तव्य बजावताना एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; संगमनेर आगारावर शोककळा
Bus Conductor Death : कर्तव्य बजावताना एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; संगमनेर आगारावर शोककळा

Bus Conductor Death : संगमनेर : संगमनेर आगारातील एका कर्तव्यदक्ष एसटी वाहकाचा ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या (Heart Attack) तीव्र झटक्याने मृत्यू (Death) झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमनाथ सुकदेव मधे (वय ४७, रा. साकुर) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संगमनेर एसटी आगारासह (Sangamner ST Depot) साकूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले

याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर आगाराची संगमनेर-डिग्रस ही बस घेऊन चालक डी.जे. कोटकर आणि वाहक सोमनाथ मधे हे शुक्रवारी (ता. २०) मार्च रात्री डिग्रस येथे मुक्कामासाठी गेले होते. रात्रीचा मुक्काम आटोपल्यानंतर शनिवारी (ता. २१) मार्च पहाटे बस पुन्हा मार्गस्थ करण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास वाहक सोमनाथ मधे हे तोंड धुण्यासाठी गेले असता, त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. चालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना ‘मृत घोषित’ केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मनमिळावू सहकारी गमावल्याची भावना (Bus Conductor Death)

आपल्या कर्तव्यावर असतानाच सोमनाथ मधे यांनी जगाचा निरोप घेतल्याने संगमनेर आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक मनमिळावू आणि कष्टाळू सहकारी गमावल्याची भावना संगमनेर आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी व्यक्त केली आहे. मृत सोमनाथ मधे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने मधे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी, साकूर येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.