Art and Craft Exhibition : अकोले : येथील मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलमध्ये (Marutirao Kote Abhinav Public School) नुकतेच चित्रकला व हस्तकला प्रदर्शन (Art and Craft Exhibition) आयोजित करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी (Students) सहभाग नोंदवला.
अवश्य वाचा : कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी मंजूर; तांबे यांच्या प्रयत्नांना यश
विद्यार्थ्यांनी सादर केल्या रंगीबेरंगी कलाकृती
अभिनवचे माजी विद्यार्थी अॅड. योगेश मुंदडा, सागर साबळे, अगस्ति विद्यालयाचे कलाशिक्षक प्रकाश डोळस, निशांत बिबवे यांच्या हस्ते या आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी., विभागप्रमुख ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स स्मिता पुंड, पर्यवेक्षक पराग सानप, समुपदेशक आरती जाधव, कला विभागप्रमुख संतोष घोडेकर, सुमन धिंदळे उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयाच्या आधारे आपल्या कौशल्यामधून वेगवेगळ्या रंगीबेरंगी कलाकृती सादर केल्या होत्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अनेक विषयांवर आधारित हे प्रदर्शन (Art and Craft Exhibition)
टाकाऊपासून टिकाऊ, वस्तू चित्र, स्मरण चित्र, संकल्पचित्र, हस्ताक्षर, प्रिंट मेकिंग, पतंग बनवणे, मातीकाम, पणती सजावट भेटकार्ड, वॉलपीस, झुंबर, फोटो फ्रेम, फुलदाणी, स्केच, राखी बनवणे, मंडला डिझाईन तसेच विविध आकाराची फुले व मातीकाम अशा अनेक विषयांवर आधारित हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी हस्तकलेच्याही वस्तू पाहावयास मिळाल्या.



