Snehalaya : साऊ ट्रस्टच्या प्रतिमा कुलकर्णी यांना ‘स्नेहाधार गौरव’ पुरस्कार प्रदान

Snehalaya : साऊ ट्रस्टच्या प्रतिमा कुलकर्णी यांना ‘स्नेहाधार गौरव’ पुरस्कार प्रदान

0
Snehalaya : साऊ ट्रस्टच्या प्रतिमा कुलकर्णी यांना ‘स्नेहाधार गौरव’ पुरस्कार प्रदान
Snehalaya : साऊ ट्रस्टच्या प्रतिमा कुलकर्णी यांना ‘स्नेहाधार गौरव’ पुरस्कार प्रदान

Snehalaya : अकोले : स्नेहालय (Snehalaya) अहिल्यानगर संचलित स्नेहाधार (Snehadhar) पुणे प्रकल्पातर्फे एकल महिलांसाठी कार्य करत असलेल्या अकोलेतील साऊ ट्रस्टच्या प्रतिमा कुलकर्णी (Pratima Kulkarni) यांना ‘स्नेहाधार गौरव’ पुरस्काराने पुणे येथील निवारा सभागृहात नुकतेच सन्मानित करण्यात आले.

अवश्य वाचा : कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी मंजूर; तांबे यांच्या प्रयत्नांना यश

सोनाली देशपांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा कुलकर्णी, मंगेशी मून यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना कुलकर्णी यांनी हा पुरस्कार माझा एकटीचा नसून संकटाच्या काळात हिमतीने उभ्या राहिलेल्या एकल महिलांचा हा सन्मान आहे. आमच्या सोबत राज्यभर काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा आहे. एकल महिलांचे सर्वेक्षण शासन करत आहे. एकल महिलांसाठी शासकीय धोरण बनू पहात आहे ही नक्कीच आशादायी गोष्ट आहे. या पुरस्काराने पुढील कार्यासाठी नक्कीच बळ मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सन्मान (Snehalaya)

या कार्यक्रमासाठी स्नेहालयचे गिरीष कुलकर्णी, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सिस्कॉमचे राजेंद्र धारणकर, शशिकांत सातभाई, स्नेहाधारचे विश्‍वस्त मंडळ उपस्थित होते. यावेळी बोलताना सोनाली देशपांडे व गिरीष कुलकर्णी यांनी एकल महिलांचा दुर्लक्षित प्रश्‍न या कामातून समाजाच्या पुढे आणून त्यांचे सक्षमीकरण करत आहेत, यासाठी हा सन्मान असल्याचे सांगितले. हा पुरस्कार एकल महिलांच्या कामासाठी दिल्यामुळे पुरस्कार स्वीकारताना पुण्यातील नाजमिन शेख या एकल महिलेला त्यांनी व्यासपीठावर सोबत नेले. कोरोनात पती आणि मुलगा गमावल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या नाजमिनला ७५ हजारांचे ब्युटी पार्लर लोकसहभागातून उभे करून दिले. त्या आज आत्मविश्‍वासाने उभ्या राहिल्या आहेत.