Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Fraud : नगर : अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या (Online Trading) आमिषाने ३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगरचा संकल्प थोरात यंग ऑलिम्पिकचा ॲम्बेसेडर; करणार भारताचे प्रतिनिधित्व

जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष

फिर्यादी हे एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. ८ मे २०२४ रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेघा शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला. तिने शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दळवी यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सदर ग्रुपमध्ये ट्रेडिंगविषयक मार्गदर्शन दिले जात असल्याने दळवी यांनी सुरूवातीला लहान रकमेची गुंतवणूक केली. ॲपवर नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

३ लाख ५० हजारांची फसवणूक (Fraud)

काही दिवसांनी त्यांना दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲड करून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार दळवी यांनी जून ते जुलै २०२४ दरम्यान वेगवेगळ्या तारखांना एकूण ३ लाख ५० हजार रूपये संबंधित खात्यांमध्ये जमा केले. ॲपमध्ये नफा दिसत असला तरी प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे विड्रॉल होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री त्यांना झाली.

या घटनेनंतर दळवी यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर ३ जुलै २०२४ व १६ जुलै २०२४ रोजी स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात २१ मार्च २०२६ रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.